वृत्तसंस्था / नवी दिल्ली
गेल्या वर्षी पुणे हाफ मॅरेथॉनमधील विजेता प्रधान विलास किरुलकर उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्याने त्याच्यावर हंगामी स्वरुपी निलंबनाची कारवाई एआययुने केली आहे.
गेल्या वर्षी झालेल्या पुणे हाफ मॅरेथॉनमध्ये किरुलकरने 1 तास, 4 मिनिटे आणि 22 सेकंदांचा अवधी घेत विजेतेपद मिळविले होते. या मॅरेथॉननंतर त्याची उत्तेजक चाचणी घेण्यात आली. त्याच्या मुत्रल चाचणीमध्ये निर्बंध घातलेले उत्तेजक द्रव्य आढळले. यानंतर एआययूने त्याच्यावर हंगामी स्वरुपी निलंबनाची कारवाई केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडाक्षेत्रामध्ये उत्तेजकाचा वापर होऊ नये यासाठी विश्व अॅथलेटिक्स फेडरेशन उत्तेजक विरोधी संघटनेच्या सहकार्याने खेळाडूंची उत्तेजक चाचणी घेतली जाते. रशियाची टेनिसपटू मारिया शरापोव्हा हिने उत्तेजकाचा वापर केल्याचे आढळून आल्याने तिच्यावर 2016 साली निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.









