कराड :
कराड तालुक्यातील शेणोली येथे रेल्वे मार्गावर अज्ञात इसम धावत्या रेल्वेमधून पडून मयत झाला आहे. याबाबतची गुन्हा मिरज लोहमार्ग पोलिसांनी दाखल केला आहे. हा प्रकार 19 रोजी रात्री 11.20 पूर्वी घडला आहे.
सदर इसमाचे वय अंदाजे 30 वर्षे असून सडपातळ बांधा, गहु वर्ण, सरळ नाक, गोल चेहरा, उजव्या हातारा सागर असे गोंदले असून हाताच्या पोटरीवर सोनू लव्ह असे लिहले आहे. सदर बेवारस मयत व्यक्तीचा तपास रेल्वे पोलीस जी. बी. ठोंबरे करत आहेत.








