हिंडलगा दि. 20 ( वार्ताहर) मुळची तुडये ता.चंदगड व सध्या हिंडलगा येथील रहिवासी सविता संदीप पाटील हिला फॅशन शोमध्ये अजिंक्यपद देण्यात आले. जीवन संघर्ष फाउंडेशन व निल क्रिएशन यांच्यावतीने नुकताच मिसेस बेळगाव या स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत सविता पाटील हिची मिसेस बेळगाव बार कर्नाटक म्हणून निवड करून अजिंक्यपद दिले. यामुळे प्रशस्तीपत्र, पुष्पगुच्छ व बक्षीस देऊन गौरविण्यात आले .या फाउंडेशनचे आयोजक डॉ. गणपत पाटील यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला डॉ. देवेगौडा, पोतदार ज्वेलर्स चे संचालक मिहीर पोतदार व इतर मान्यवर उपस्थित होते या सर्वांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यापूर्वी देखील अशा स्पधून तिला गौरविण्यात आले आहे. या अभिनंदनीय निवडीमुळे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Previous Articleगोव्यातील महिलेकडून ड्रग्जचा पुरवठा
Next Article शिवाजी पुल- गांधीनगर उड्डाणपूल डिपीआर तयार करा









