मुंबई
बॉलीवूडची अभिनेत्री क्रिती सेनॉन डिसेंबर २०२५ मध्ये तिच्या बहुचर्चित बॉयफ्रेण्ड सोबत लग्न करणार असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. क्रितीचा बॉयफ्रेण्ड बिझनेसमन कबीर बहिया सोबत ती अनेक कार्यक्रमांमध्ये दिसली. त्यामुळे त्यांच्या लग्नाच्या चर्चा जोरदार सुरू होत्या.
काही दिवसांपूर्वी क्रिती दिल्ली विमानतळावर बॉयफ्रेण्ड कबीर सोबत दिसली होती. यानंतर दोघांनी ख्रिसमस व्हेकेशनस् एकत्र साजऱ्या केल्या असल्याचे रुमरही पसरले होते. अशातच क्रितीच्या निकटवर्तींयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, क्रितीच्या२०२५ इयर प्लॅनमध्ये लग्न या विषयाची नोंदणीसुद्धा नाही आहे. हे संपूर्ण वर्ष क्रिती तिच्या नवनवीन प्रोजेक्टमध्ये बिझी असणार आहे.
सध्या क्रिती दिल्लीमध्ये शुटींग करत आहे. आनंद एल राय यांच्या आगामी सिनेमाचे शुटींग दिल्लीमध्ये सुरू आहे. या सिनेमाच्या शुटींगनंतर क्रितीने पुढच्या प्रोजेक्टस् च्या तारखा दिलेल्या आहेत. तिच्याकडे शुटींग स्केड्युल दरम्यान ब्रेक घेण्यासाठीही वेळ नसल्याचीही माहिती समोर आली.
क्रिती सेनॉनचा तेरे इश्क में सिनेमाचा टिझर ला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.
Previous Articleसांगलीत शनिवारपासून द्राक्ष महोत्सवाचे आयोजन
Next Article हजारो भाविक देव लिंगेश्वर चरणी लीन !









