सांगली :
शेतकऱ्यांकडून थेट ग्राहकांना ताजी व द्रर्जेदार द्राक्षे मिळावीत यासाठी सांगलीत द्राक्ष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य कृषि पणन मंडळ कोल्हापूर तसेच सांगली बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने २२ ते २६ फेब्रुवारी दरम्यान नेमीनाथनगर मधील कल्पद्रुम मैदानावर हा महोत्सव होणार आहे.
सांगली आणि कोल्हापूर जिल्हयातील द्राक्षउत्पादक शेतकरी या महोत्सवात सहभागी होणार आहेत. या शेतकऱ्यांना बाजारपेठ मिळावी तसेच ग्राहकांना थेट दर्जेदार व ताजी द्राक्षे मिळावी यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.








