शिरोडा-वेळागर येथील देव लिंगेश्वराचा 22 वा वर्धापन दिन उत्साहात
वेंगुर्ले (वार्ताहर)-
वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा – वेळागर येथील श्रीदेव लिंगेश्वराचा 22 वा वर्धापन दिन कार्यक्रम विविध धार्मिक पुजापाठ, लिंगेश्वरावर 5 ब्राम्हणांच्या माध्यमातून दुग्धाभिषेक, लघुरुद्र व वरद शंकर पुजनाने भाविकांच्या उत्स्फुर्त सहभागांत धार्मिक वातावरणात संपन्न झाला. देवगड येथील नावाजलेल्या श्रीदेव कुणकेश्वर प्रमाणे थेट लिंगेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात अगदी जवळून भाविकांना दर्शनाचा लाभ मिळाल्याने शिरोडा परिसरातील भक्तांबरोबरच या देवाच्या वर्धापन दिनास आलेल्या भाविकांना मनापासून खरे समाधान भाविकांना मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आला.शिरोडा वेळागर श्री देव लिंगेश्वर मंदिराचा 22 वा वर्धापन दिन आज गुरुवारी मंदिरात विविध धार्मिक विधी, लिंगेश्वराच्या पिंडीवर 5 ब्राह्मणांकरवी दुग्धाभिषेक करण्यात आला. मंदिराच्या गाभाऱ्यात श्रीदेव लिंगेश्वरच्या पिंडीची व परिसराची विविध पुष्पपुजेने सजावट करण्यात आली होती. मंदिरात वरद शंकर महापुजा झाल्यानंतर देवतेची महाआरती नंतर देवतेस प्रतिवर्षी प्रमाणे वेळागर मधील सर्व रयतेच्या उपस्थितीत ब्राह्मणाकरवी गाऱ्हाणे देण्यात आले. त्यानंतर या देवतेस नारळ, केळी, पुष्पहार व फुले वाहण्यासाठी शेकडो भाविकांनी गर्दी केली. श्री देव लिंगेश्वराच्या दर्शनांस आलेल्या सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचा कार्यक्रम नवीन संचालक मंडळाने संस्थापक अध्यक्ष माजी शंकर कांबळी यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबध्द करण्यात आला होता. शिरोडा वेळागर येथील श्री देव लिंगेश्वर मंदिर वर्धापनदिन सोहळा यशस्वीपणे पार पडण्यासाठी संस्थापक अध्यक्ष माजी आमदार शंकरभाई कांबळी यांच्या मार्गदर्शनाखाली देवस्थानची नुतन कार्यकारीणी अध्यक्ष-जगन्नाथ डोंगरे, उपाध्यक्ष-प्रदीप भगत, सचिव-दिलीप गवंडी, खजिनदार विजयकुमार शिरगांवकर, संचालक-श्रीकृष्ण पडवळ, संदिप धानजी, अनिल कुडव, हेमंत रेडकर, उदय मिशाळ, शरद उर्फ नंदू कांबळी, प्रसाद सुर्याजी, आनंद नाईक, पांडुरंग नाईक, तानाजी मयेकर, जनार्दन पडवळ, मदन अमरे (पुजारी), सल्लागार संस्थापक अध्यक्ष शंकरभाई कांबळी, दिनेश बर्डे, महादेव उर्फ भाई रेडकर, विजय पडवळ, मनोहर होडावडेकर यांनी नियोजन केले होते . या लिंगेश्वराचे दर्शनासाठी शिवसेना पक्षाचे पदाधिकारी कौशिक परब, उद्योजक रविंद्र कांबळी, भरत कांबळी, महोदव उर्फ भाऊ आंदुर्लेकर, वेंगुर्ले पंचायत समितीचे माजी सभापती जयप्रकाश चमणकर, यासह शिरोडा गावातील सामाजिक कार्यकर्ते खास उपस्थित रहात देवतेचे दर्शन घेतले. तसेच विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी श्रीदेव लिंगेश्वर देवतेचे दर्शन घेतले. लिंगेश्वर मंदिराच्या परिसरात भाविकांच्या टू व्हीलर , फोर व्हीलर गाड्यांसाठी पार्कीगची सुविधा, केळी, नारळ, फुले विक्री वाल्यांसाठी जागा तसेच जेष्ठ नागरीकांना महाप्रसादासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली होती. शिरोडा वेळागर भागातील 14 वाड्यातील भाविकांकडून विविध स्वरूपांत देवतेचा उत्सवांकरीता वस्तु स्वरूपात विविध देणग्या देण्यात आल्या होत्या. महाप्रसादासाठी तियारा तेजस तळकर, नितीन रामचंद्र सावंत, प्रवीण नांदोस्कर कुटुंबियांकडून अन्नदानाची व्यवस्था करण्यात आली होती. तर सर्व भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने शुद्ध व स्वच्छ फिल्टर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आजू अमरे यांनी केली होती. संपूर्ण देवस्थानची रंगरंगोटी उद्योजक भरत कांबळे यांनी तर मंदिरा तील श्रीदेवी लिंगेश्वराची पशुपूजेने सजावट सुवेग कळंगुटकर व तेजस तळकर यांनी केलेली होती. लिंगेश्वर देवस्थानचे नुतन अध्यक्ष जगन्नाथ डोंगरे व संस्थापक अध्यक्ष माजी आमदार शंकरभाई कांबळी यांनी सर्व भाविकांचे स्वागत करण्यात गुंतलेले होते. दुपारच्या महाप्रसादाचा सुमारे 7 हजार भाविकांनी लाभ घेतला. सायंकाळी भजने पालखी, प्रदक्षिणा, बक्षिस वितरण समारंभ तसेच रात्री खानोलकर दशावतारी नाठ्य मंडळाचा दशावातारी नाट्यप्रयोग सादर झाला. या सर्व कार्यकमांचा भाविकांनी व रसिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला









