कोल्हापूर :
शहरातील रामानंदनगर येथील राजवीर हाईट्स या अपार्टमेंट मधील एका शिक्षिकेचा बंद प्लॅटच्या दरवाजाचे कुलूप आणि कडी कोयंडा तोडुन चोरट्याने आत प्रवेश केला. प्लॅटमधील बेडऊम मधील तिजोरी फोडून, त्यातील 10 लाख 20 हजार रुपये किंमतीचे 17 तोळे सोन्याचे दागिणे आणि 72 हजार रुपये किंमतीची चांदीची भांडी असा 10 लाख 92 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरट्याने चोरुन नेला. चोरीची ही घटना बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. याची नोंद करवीर पोलिसात झाली असून, याची फिर्याद शिक्षीका मृणालीनी संजय सुतार यांनी दिली आहे.
मृणालीनी सुतार या रामानंदनगरातील राजवीर हाईट्स या अपार्टमेंटमधील बी विंग पहिल्या मजल्यावरील प्लॅटमध्ये राहत आहेत. त्यांच्या मुलग्याची तब्येत बिघडल्याने त्याला उपचारासाठी शहरातील दाभोळकर कॉर्नर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. त्याला जेवणाचा डबा देणेसाठी मंगळवारी रात्री मृणालीनी सुतार आणि त्यांची बहिण गितांजली या दोघी जणी गेल्या होत्या. या दोघी जणी मंगळवारी रात्री रुग्णालयात झोपल्या. त्यामुळे त्यांच्या प्लॅटमध्ये राहण्यास कोणीही नव्हते. याची संधी साधून चोरट्याने मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या बंद प्लॅटच्या दरवाज्याचे कुलूप आणि कडी कोयंडा तोडुन आत प्रवेश केला. प्लॅटमधील बेडऊम मधील तिजोरी फोडून, त्यातील 60 ग्रॅमच्या बिलवर पाटल्या 6 नग, 10 ग्रॅमचा जोंधळी मणीहार एक, 10 ग्रॅम व 20 ग्रॅमचे दोन मंगळसुत्र, 10 ग्रॅमची चेन, 20 ग्रॅमचा राणीहार, प्रत्येकी 10 ग्रॅमच्या तीन अंगठ्या, 10 ग्रॅमचा लक्ष्मीहार असा 10 लाख 20 हजार रुपये किंमतीचे 17 तोळे सोन्याचे दागिने आणि 72 हजार रुपये किंमतीची 1 हजार 200 ग्रॅमची चांदीच्या भांडी असा एकूण 10 लाख 92 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरट्याने चोरुन नेला.
बुधवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास शिक्षीका मृणालीनी सुतार यांच्या घरातील मोलकरीन रुपाली दाभाडे या कामानिमित्याने त्यांच्या प्लॅटवर आला. त्यावेळी तिला प्लॅटच्या गॅलरीतील लोखंडी दरवाजा आणि मुख्य दरवाजाचे कुलूप आणि कडी कोयंडा तोडलेला व प्लॅट उघडे असल्याचे दिसले. तिने यांची तत्काळ फोन मृणालीनी सुतार यांना माहिती दिली. त्यावऊन त्या त्वरीत ऊग्णालयातून प्लॅटकडे आल्या. त्यांनी प्लॅटची पाहणी केली असता त्यांना बेडरूमधील तिजोरी फोडून, त्यामधील साहित्य विस्कटून टाकून, त्यातील 10 लाख 20 हजार ऊपये किंमतीचे 17 तोळे सोन्याचे दागिणे आणि 72 हजार ऊपये किंमतीची चांदीची भांडी असा 10 लाख 92 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरीला गेल्याचे दिसून आले. त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यावऊन करवीर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा कऊन, चोरटे परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले का ? याकरीता परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी सुरु केली. रात्री उशिरापर्यंत सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज हाती लागले की नाही यांची माहिती मिळू शकली नाही.








