केएससीए सेकंड डिव्हीजन क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यताप्राप्त, धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए सेकंड डिव्हीजन क्रिकेट स्पर्धेत बेळगाव स्पोर्ट्स क्लब ब ने क्रिकेट क्लब ऑफ कर्नाटक संघाचा 6 गड्यांनी तर अमृत पोतदार सीसीआयने टॅलेन्ट स्पोर्ट्स संघाचा 3 गड्यांनी पराभव करुन प्रत्येकी 4 गुण मिळविले. स्वयम अप्पण्णावर, आशुतोष हिरेमठ यांना ‘सामनावीर’ पुरस्कार देण्यात आला. केएससीए बेळगाव मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात क्रिकेट क्लब ऑफ कर्नाटक संघाने प्रथम फलंदाजी करताना 49.4 षटकात सर्वगडी बाद 250 धावा केल्या. त्यात लिखित बन्नूरने 7 षटकार, 4 चौकारांसह 81, बाहुबली चौगुलाने 2 चौकारांसह 28, आदर्श नायकने 1 षटकार 4 चौकारांसह 44, तेजस मुर्डेश्वरने 18, रवी श्रीकांतने 15 तर श्रीकेश शेट्टीने 12 धावा केल्या.
बेळगाव स्पोर्ट्स क्लबतर्फे सोहम पाटीलने 45 धावांत 4, सागर पाटीलने 55 धावांत 2 तर साई कारेकर, ध्रुव देसाई, ओमकार देशपांडे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना बेळगाव स्पोर्ट्स क्लब ब ने 43.3 षटकात 4 गडी बाद 252 धावा करुन सामना 6 गड्यांनी जिंकला. त्यात आशुतोष हिरेमठने 3 षटकार, 14 चौकारांसह नाबाद 106 धावा करुन दमदार शतक झळकविले. त्याला अर्णव नुगानट्टीने 5 षटकार 7 चौकारांसह नाबाद 64, साई कारेकरने 16 तर अर्णव कुंदपने 12 धावा करुन सुरेख साथ दिली. कर्नाटक क्रिकेट क्लबतर्फे आदर्श, लिखित, संपत्त, तेजस यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
दुसऱ्या सामन्यात टॅलेन्ट स्पोर्ट्सने प्रथम फलंदाजी करताना 49.5 षटकात 238 धावा केल्या. त्यात रवीकुमार एस.ने 1 षटकार 7 चौकारांसह 52, प्रवीण कोझीयालने 5 चौकारांसह 30, निश्चित हेगडेने 5 चौकारांसह 26, विरेशने 18, प्रितमने 22 तर अझरुद्दीन व बसनगौडाने प्रत्येकी 11 धावा केल्या. अमृत पोतदार सीसीआयतर्फे स्वयम अप्पण्णावरने 35 धावांत 5, किरणकुमारने 47 धावांत 2 तर प्रज्वल आणि पार्थने प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना अमृत पोतदार सीसीआयने 46 षटकात 7 गडी बाद 239 धावा करुन सामना 3 गड्यांनी जिंकला. त्यात स्वयम अप्पण्णावरने 3 षटकार 10 चौकारांसह नाबाद 71, सुमित शिरगुरकरने 1 षटकार 9 चौकारांसह 47, प्रज्वलने 31, अमोघ नायकने 27, तर जिनद ए.बीएम.ने 14 धावा केल्या. टॅलेन्टतर्फे बसू गौडाने 24 धावांत 3 तर शरणगौडा, रवीकुमार व निश्चित हेगडे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.









