पनीर हे प्रथिन (Protein) असून स्नायूंच्या वाढीसाठी आणि शरीराच्या विकासासाठी उपयुक्त ठरते. पनीरमध्ये कॅल्शियम (Calcium)असते, त्यामुळे हाडे आणि दात मजबूत करण्यास मदत करते. पनीरमध्ये फॉस्फरस (Phosphorus) असल्याने ऊर्जा निर्मिती आणि शरीरातील विविध जैविक क्रियांसाठी आवश्यक. पनीरमध्ये विटामिन बी12 (Vitamin B12) असल्याने मज्जासंस्थेसाठी आणि रक्तनिर्मितीसाठी उपयुक्त आहे. पनीर मध्ये योग्य प्रमाणात फॅट (Fat) असल्याने ते शरीराला ऊर्जा देण्यासाठी उपयुक्त ठरते.