वृत्तसंस्था/ दुबई
भारताचा गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केल कुटुंबातील आणीबाणीच्या परिस्थितीमुळे दक्षिण आफ्रिकेतील त्याच्या घरी रवाना झाला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये या पदावर नियुक्त करण्यात आलेला मोर्केल शनिवारी भारतीय संघासोबत दुबईला गेला होता आणि आज बुधवारपासून सुरू होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी संघाच्या पहिल्या सराव सत्रातही सहभागी झाला होता.
तथापि हा दक्षिण आफ्रिकेचा 40 वर्षीय माजी वेगवान गोलंदाज सोमवारी भारतीय संघाच्या दुसऱ्या सराव सत्रास उपस्थित नव्हता, असे कळले आहे. गुऊवारी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवरील बांगलादेशविऊद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुऊवात करण्याची तयारी भारत करत असतानाच ही घटना घडली आहे. या आयसीसी स्पर्धेसाठीच्या भारताच्या वेगवान गोलंदाजी विभागात खास वेगवान गोलंदाज आणि हार्दिक पंड्यासारखा वेगवान गोलंदाजी करू शकणारा अष्टपैलू खेळाडू समाविष्ट आहे.
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला पाठीच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडावे लागल आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाजीची जबाबदारी अर्शदीप सिंग, हर्षित राणा आणि मोहम्मद शमी यांच्यावर सोपवण्यात आली आहे. पंड्या हा चौथा पर्याय राहील. पाकिस्तान हा यजमान देश असला, तरी मान्य केलेल्या हायब्रिड मॉडेलनुसार भारत त्यांचे सर्व सामने दुबईमध्ये खेळेल. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित सामना रविवारी होणार आहे. पहिला उपांत्य सामना 4 मार्च रोजी दुबईमध्ये खेळला जाईल आणि जर भारत पात्र ठरला, तर अंतिम सामनाही 9 मार्च रोजी दुबईमध्ये होईल.









