रत्नागिरी :
रत्नागिरी विमानतळाच्या नूतनीकरण कामाची प्रगती आहे. आरसीएस अंतर्गत १० टक्के काम पूर्ण झाल्याचे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (एमएडीसी) उपाध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे यांनी सोशल मिडीयावर एक अपडेट शेअर केला, त्यात हे नमूद करण्यात आले आहे.
प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजने (आरसीएस) अंतर्गत रत्नागिरी विमानतळाचा पुनर्विकास स्थिर प्रगती करत आहे. १० टक्के काम आधीच साईटवर पूर्ण झाले आहे. ५५.५६ कोटी रुपयांचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प प्रादेशिक हवाई संपर्क वाढवण्यासाठी, पर्यटनाला आणि प्रदेशातील आर्थिक वाढीला चालना देण्यासाठी सज्ज आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या उपाध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे यांनी सोशल मिडीयावर एक अपडेट शेअर केला. ज्यात पायाभूत सुविधा प्रकल्प वेळेवर पूर्ण करण्यासाठी साईट देखरेखीचे महत्व अधोरेखित केले. त्यांनी या उपक्रमाचे वर्णन रत्नागिरीसाठी गेम चेंजर म्हणून केले. अपग्रेड केलेल्या विमानतळावर सुमारे ३,३९० चौरस मीटर क्षेत्रफळ असलेली अत्याधुनिक पॅसेंजर टर्मिनल बिल्डिंग असेल, जी प्रति तास १२५ प्रवाशांना हाताळण्यासाठी डिझाईन केलेली असेल. १८ महिन्यात पूर्ण होण्याच्या नियोजित या प्रकल्पात सौंदर्यवाढीसाठी जीआरसी क्लॅडिंग आणि लैंडस्केपिंगचा समावेश असेल. तसेच ९५० चौरस मीटरचा युटिलिटी ब्लॉकही समाविष्ट असणार आहे. विमान वाहतूक पायाभूत सुविधांव्यतिरिक्त विकास आराखड्यात प्रतिकात्मक व सांस्कृतिक घटकांचा समावेश आहे. डोर्श प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (पीएमसी) म्हणून काम करत असताना व न्याती कंत्राटदार म्हणून काम करत असल्याने पुनर्विकासाचे उद्दिष्ट रत्नागिरीला एक प्रमुख विमान वाहतूक केंद्रात रूपांतरित करणे, हे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे कनेक्टिव्हिटीमध्ये लक्षणीय सुधारणा होण्याची आणि प्रदेशाच्या आर्थिक आणि पर्यटन क्षेत्रांना पाठिंबा मिळण्याची अपेक्षा आहे. समाजमाध्यमांवरील पोस्टमध्ये पांडे यांनी हा प्रकल्प कधी पूर्ण होणार आहे, या विषयावर कसलाही उल्लेख केलेला नाही.








