वृत्तसंस्था/ डिलेरी बीच
एटीपी टूरवरील येथे सुरु असलेल्या डेलरे बीच पुरुषांच्या खुल्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत सर्बियाचा मिओमीर केसमानोविच आणि स्पेनचा आठवा मानांकित फोकिना यांनी एकेरीची अंतिम फेरी गाठली.
25 वर्षीय केसमानोविचने उपांत्य फेरीच्या सामन्यात अमेरिकेच्या तृतीय मानांकित अॅलेक्स मिचेलसनचा 7-6 (7-3), 6-3 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. केसमानोविचला विजयासाठी तब्बल दीड तास झगडावे लागले. एटीपी टूरवरील स्पर्धेत केसमानोविचने पाचव्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. तर 2020 साली त्याने एटीपी टूरवरील एकमेव स्पर्धा आतापर्यंत जिंकली आहे. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात 25 वर्षीय फोकिनाने आपली विजयी घोडदौड कायम राखताना इटलीच्या मॅटो अमाल्डीवर 6-4, 6-4 अशी मात करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. हा सामना 100 मिनिटे चालला होता. 2022 च्या माँटेकार्लो टेनिस स्पर्धेत फोकिनाने टेनिस क्षेत्रात पदार्पण केले होते.









