बंगालच्या भूमीवरून महत्त्वाचे वक्तव्य : हिंदू समाज संघटित होण्याची गरज
वृत्तसंस्था/ कोलकाता
सरसंघचालक मोहन भागवत यंनी जगाच्या विविधतेला स्वीकाराच्या महत्त्वावर जोर देत एकतेतच विविधता सामावलेली असल्याचे हिंदू समाजाचे मानणे असल्याचे प्रतिपादन रविवारी केले. पश्चिम बंगालच्या वर्धमान येथील संघ कार्यक्रमाला त्यांनी संबोधित केले. आम्ही केवळ हिंदू समाजावरच लक्ष का देतो असे लोक अनेकदा विचारतात, यावर माझे उत्तर देशाचा जबाबदार समाज हिंदू समाज असल्याचे आहे असे भागवत म्हणाले.
जे लोक संघाविषयी जाणत नाहीत, ते संघ काय इच्छितो असा प्रश्न विचारताल. जर मला उत्तर द्यायचे असते, तर मी संघ हिंदू समाजाला संघटित करू इच्छितो, कारण हा देशाचा जबाबदार समाज असल्याचे सांगू इच्छितो. भारत केवळ भूगोल नाही, काही लोक भारताच्या मूल्यांनुसार जगू शकले नाहीत, त्यांनी वेगळा देश निर्माण केला, परंतु जे लोक येथे राहिले, त्यांनी स्वाभाविकपणे भारताचे मूळ तत्व अंगिकारले आणि हे मूळ तत्व काय आहे? हा हिंदू समाज आहे, जो जगाच्या विविधतेला स्वीकारत बहरतो. आम्ही विविधतेत एकता असल्याचे म्हणतो. परंतु विविधता हीच एकता असल्याचे हिंदू समाजाचे मानणे असल्याचे उद्गार सरसंघचालकांनी काढले आहेत.
भारतात कुणीही सम्राटांना आठवत नाही, तर स्वत:च्या पित्याचे वचन पूर्ण करण्याच्या उद्देशाने 14 वर्षांसाठी वनवासाला जाणारा भगवान राम अन् स्वत:च्या भावाच्या पादुका सिंहासनावर ठेवणाऱ्या आणि वनवासातून परतल्यावर भावाला राज्य सोपविणाऱ्या भरताला आठवत असतात असेही त्यांनी म्हटले आहे.
हिंदूच पूर्ण देशाच्या विविधतेला एकजूट ठेवतात. दुसऱ्यांना दुखावतील अशा कार्यांमध्ये आम्ही सामील होत नाही. शासक, प्रशासक आणि महापुरुष स्वत:चे काम करतात, परंतु समाजाने राष्ट्राच्या सेवेसाठी पुढे रहायला हवे. आम्हाला हिंदूभ् समाजाला एकजूट अन् संघटित करण्याची गरज आहे. समस्यांचे स्वरुप काय आहे याऐवजी आम्ही त्यांचा सामना करण्यासाठी किती तयार आहोत हे महत्त्वाचे आहे असे भागवत यांनी नमूद केले आहे.
काही क्रूर लोकांनी, जे गुणांनी श्रेष्ठ नव्हते, त्यांनी भारतावर राज्य केले आणि यादरम्यान समाजात विश्वासघाताचे चक्र जारी राहिले. या देशाची निर्मिती इंग्रजांनी केली नव्हती. भारत एकजूट नाही ही भावना इंग्रजांनी लोकांच्या मनात पेरली होती असे सरसंघचालक यांनी म्हटले आहे.









