प्रयागराज येथील महाकुंभ पर्वणीची सध्या देशभर जोरदार चर्चा आहे. आतापर्यंत 50 कोटींहून अधिक भाविकांनी येथील त्रिवेणी संगमात स्नान केले आहे. संगमावरील विविध घाटांवर भाविकांची प्रचंड गर्दी होत असल्याने एक पवित्र डुबकी घेण्यासाठी 25 ते 30 किलोमीटरचे अंतर चालावे लागत आहे. कित्येकांना स्नानासाठी तीन तीन दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. संगम परिसरातील भूमीवर सहस्रावधी एकर भूमीत देशाच्या विविध भागांमधून आलेले लोक वास्तव्यास असून आपला क्रमांक कधी लागतो याची प्रतीक्षा करीत आहेत.
कितीही त्रास सहन करावा लागला, तरी चालेल, पण पवित्र महाकुंभ स्नान करायचेच अशा निर्धाराने भाविक आलेले दिसून येतात. मात्र, उत्तर प्रदेशातील चार युवकांनी या गर्दीचा कोणताही त्रास न होता महाकुंभ स्नानाची पर्वणी साधता यावी, यासाठी एक नामी उपाय शोधून काढला. सध्या याची चर्चा सर्वत्र होत आहे. या युवकांनी गर्दी संपर्क किंवा पायी चालून जाण्याचा त्रास टाळून थेट संगमस्थान गाठण्यासाठी 248 किलोमीटरचा प्रवास नावेने गंगा नदीच्या मध्यभागातून केला आहे. अशा प्रकारे त्यांनी तीर किंवा घाट टाळून थेट नदीतून संगमावर जाऊन पवित्र स्नान केले. मात्र, यासाठी त्यांना हा 248 किलोमीटरचा प्रवास नावेने केला. रेल्वे आणि बसेसना होणारी प्रचंड गर्दी, घाटांवर 15 ते 20 किलोमीटरची रांग हे सर्व टाळून त्यांनी नदीतूनच संगमस्थानापर्यंत पोहचण्यात यश मिळविल्याने त्यांच्या या युक्तीचे कौतुक अनेकांनी केले आहे. या युवकांनी नदीतून प्रवास करत संगमस्थानापर्यंत जाताना आपल्या प्रवासाचा व्हिडीओ काढून तो प्रसिद्ध केल्याने त्यांनी शोधलेल्या या उपायाची माहिती सर्वांना कळली आहे.
या युवकांनी हा नौकाप्रवास नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, अर्थात, पश्चिमेकडून पूर्वेकडे असा केल्याचे दिसून येते. हे युवक कानपूर किंवा त्याहीपेक्षा अधिक पूर्वेकडच्या स्थानावरुन आल्याचे दिसून येते. या युवकांच्या परिचितांनी दिलेल्या माहितीनुसार बिहारच्या बक्सर येथून त्यांनी आपल्या नौका प्रवासाला प्रारंभ केला. हा उपाय इतर अनेक लोक का करत नाहीत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तथापि. गंगा नदीतून इतका लांबचा प्रवास करणे कठीण असते. या युवकांनी ते धाडस दाखविले, त्यामुळे त्यांना सुलभरित्या संगमस्नान करता आले. त्यांच्या या युक्तीचे तसेच साहसाचे सोशल मिडियावर कौतुक पेले जात आहे.









