आत्महत्येमागचे कारण अस्वस्थ करणारे
अलिबाग
अटल सेतूवरून अलिबागच्या शिक्षकाने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अलिबाग येथे राहणाऱ्या एका शिक्षकाने शिवडी न्हावा-शेवा अटल सेतूवरून समुद्रात उडी घेतली. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. या घटनेनंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
या संदर्भातील अधिक माहिती अशी, वैभव पिंपळे (दि. ४५) असे मृत शिक्षकाचे नाव आहे. पिंपळे अलिबागमधील कुर्डुस गावात राहणास होते. शुक्रवारी सकाळी चारचाकीने अटल सेतु वर जाऊन त्यांनी समुद्रात उडी मारली. पुलावरील सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाने तत्काळ पोलिसांना कळविले. माहिती मिळताच पोलिसांनी चारचाकी जवळ धाव घेतली. मात्र त्यापूर्वीच वैभव पिंपळे यांनी समुद्रात उडी घेतली होती. दरम्यान उलवे पोलिसांनी व सागरी सुरक्षा विभागाने शोधमोहिम सुरू केली. पण रात्री उशिरापर्यंत त्यांच्या मृतदेह पोलिसांच्या हाती लागला नव्हता.
याबद्दल अधिक माहिती अशी, की पिंपळे यांना सायबर गुन्हेगारांकडून सेक्सटोरशनच्या जाळ्यात अडकविण्यात आले होते. त्यांच्याकडून यासंबंधी पैसे उकळण्यासही सुरुवात केली होती. पिंपळे हे गेल्या ८ दिवसांपासून या तणावाखाली होते. मानसिक तणावाखाली पिंपळे यांनी टोकाचे पाऊल उचलले. या घटनेची नोंद उलवे पोलिस ठाण्यात झाली असून पोलिस याप्रकरणी अधिक चौकशी तकरत आहे.
Previous Articleप्रा. प्रवीण बांदेकर यांना पीपल्स आर्ट सेंटरचा सन्मान
Next Article खड्डे सोडले अन् चांगल्या रस्त्याचे पुन्हा डांबरीकरण








