मनपा आयुक्त बी. शुभा यांनी पाहणी करून दिला आदेश
बेळगाव : अनगोळ चिदंबरनगर येथील स्मशानभूमीत मृत व्यक्तीच्या नावाची नोंद करण्यासाठी त्वरित नवीन कर्मचारी नेमण्याचा आदेश मनपा आयुक्त बी. शुभा यांनी दिला आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, सदर स्मशान भूमीतील कर्मचारी गेल्या आठ दहा दिवसापासून कामावर हजर नसल्याने अंत्यसंस्कार केलेल्या कुटुंबीयांना मृत व्यक्तीच्या नाव नोंदणीसाठी पालिकेच्या कर्मचाऱ्याला शोधण्याची वेळ आली आहे. अनगोळ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार सोपस्कार पूर्ण केल्यानंतर दर सोमवारी आणि गुऊवारी रक्षाविसर्जन विधीनंतर त्या ठिकाणी असलेल्या कार्यालयात जाऊन नागरिक मृत व्यक्तीचे नाव, मृत्यू दाखला मिळवण्यासाठी नोंद करत असतात. पण गेल्या आठ-दहा दिवसापासून कर्मचारी कार्यालयात उपस्थित नसल्याने नागरिकांनी नोंदणी कुठे करायची हा प्रŽ निर्माण झाला आहे. याबाबत माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी संबंधित कर्मचाऱ्याला फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण, कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आठ दहा दिवसापासून स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या मृत व्यक्तीची नोंद झालीच नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली आहे.
मनपा आयुक्तांकडून अधिकारी धारेवर
गुऊवारी महानगरपालिकेच्या आयुक्त बी. शुभा अनगोळ येथील पाहणी दौरा करत असताना माजी नगरसेवक विनायक गुंजटकर तसेच अजित पाटील यांनी अनगोळ येथील स्मशानभूमी संदर्भात तक्रार केली. स्मशानभूमीत गेल्या आठ दिवसांपासून महानगरपालिकेचे कर्मचारी उपलब्ध नसल्याने त्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यांनी लागलीच संबंधित अधिकाऱ्यांना याचा जाब विचारून धारेवर धरले. आणि ताबडतोब या ठिकाणी नवीन कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्याचे आदेश दिले. नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश दिले.
समस्या सोडविण्याची ग्वाही
तसेच स्मशानभूमीच्या इतर समस्येबाबत माहिती दिली या ठिकाणी पुरुषांसाठी बाथरूमची सोय आहे. पण, महिलांसाठी नाही, शेडवरील खराब झालेले पत्रे बदलणे, शेगडी रिपेरी करणे व उद्यानाच्या निर्मितीबाबत मागणी केली. तसेच या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांनी स्मशानभूमीच्या कंपाऊंडची उंची वाढवण्याची मागणी केली. अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर याठिकाणची राख वाऱ्याने उडून घरामध्ये येत आहे. त्यामुळे कंपाउंडची उंची वाढवण्यात यावी अशी मागणी केली. यावेळी आयुक्तांनी याबाबत ताबडतोब कार्यवाही करण्याची ग्वाही दिली. तसेच स्मशानभूमीत स्वच्छता कर्मचारी लावून स्वच्छता करण्याचे आदेश दिले. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी माजी नगरसेवक विनायक गुंजटकर, अजित पाटील महानगरपालिकेचे अधिकारी गुंडपण्णाव। हणमंत कलादगी, अनिल बोरगावी आरोग्य अधिकारी उपस्थित होते.









