वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
भारतातून अमेरिकेत बेकायदेशीर रितीने स्थलांतरीत झालेल्या नागरीकांची परत पाठवणी अमेरिकेकडून होतच राहणार आहे. काही दिवसांपूर्वी 104 लोकांना भारतात आणून सोडण्यात आले होते. आता आज शनिवारी अमेरिकेतून आणखी एक विधान 119 बेकायदा स्थलांतरितांना घेऊन भारतात येणार आहे. तसेच रविवारीही आणखी एक विमान अशा प्रवाशांना घेऊन भारतात उतरणार आहे. या नागरीकांना अमृतसरच्या विमानतळावर उतरविण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांचा ताबा भारताकडे दिला जाणार आहे, अशी माहिती संबंधिक विभागाने दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या शुक्रवारी झालेल्या चर्चेत बेकायदा स्थलांतराचा मुद्दाही उपस्थित झाला होता. असे स्थलांतरित परत घेण्याची इच्छा भारताने व्यक्त केली होती. भारताही आपल्या देशातील बेकायदा स्थलांतरीतांविषयी यापुढच्या काळात कठोर धोरण स्वीकारण्याची शक्यता आहे.
बेड्या घातल्या जाऊ नयेत
बेकायदा स्थलांतरीतांना अमेरिकेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही, ही बाब स्पष्ट आहे. तथापि, त्यांना परत पाठविताना साखळीने जखडून किंवा बेड्या घालून पाठविण्यात येऊ नये, असे भारताने अमेरिकेकडे स्पष्ट केल्याचे वृत्त आहे. अधिक सन्मानजनक परिस्थितीत पाठवणी व्हावी, अशी भारताची अपेक्षा आहे.









