आता 14 ऐवजी चार दिवस असणार बंदी
बेळगाव : नंदगड (ता. खानापूर) येथील महालक्ष्मी यात्रेच्या पार्श्वभूमीवर तब्बल 14 दिवस नंदगड येथे दारू विक्री बंदीचा आदेश बजावण्यात आला होता. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बुधवारी या आदेशात बदल केला असून आता 14 ऐवजी केवळ चार दिवस दारू विक्री बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. याआधीच्या आदेशानुसार मंगळवार दि. 11 फेब्रुवारीपासून 24 फेब्रुवारीच्या सकाळी 6 पर्यंत नंदगड परिसरातील दारू दुकाने, बार बंद ठेवण्याची सूचना देण्यात आली होती. जिल्हा पोलीसप्रमुखांनी पाठविलेल्या नव्या प्रस्तावानुसार रविवार दि. 16 फेब्रुवारीच्या सायंकाळपासून गुरुवार दि. 20 फेब्रुवारीच्या पहाटे पाच पर्यंत दारू विक्री बंद ठेवण्याचा नव्याने आदेश देण्यात आला आहे.









