पीएनबी बँक घोटाळ्यातील आरोपी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंजाब नॅशनल बँक म्हणजेच पीएनबी घोटाळ्यातील फरार आरोपी आणि आर्थिक गुन्हेगार मेहुल चोक्सी कर्करोगाने ग्रस्त असल्याची माहिती उघड झाली आहे. सध्या त्याच्यावर बेल्जियममध्ये उपचार सुरू आहेत. न्यायालयीन सुनावणीदरम्यान चोक्सीच्या वकिलांनी याबाबत माहिती दिली आहे. पंजाब नॅशनल बँकेला 13 हजार 400 कोटी रुपयांचा गंडा घालून मेहुल चोक्सी आणि घोटाळ्यातील मुख्य आरोपी असलेला त्याचा भाचा नीरव मोदी आपल्या कुटुंबासह देशातून फरार आहेत. तपास यंत्रणेने आर्थिक गुन्हेगार कायद्यानुसार मेहुल चोक्सीला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केले आहे. मात्र, आता मेहुल चोक्सीला कर्करोगाचे निदान झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.









