रत्नागिरी :
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर- लांजा- साखरपा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडणार आणि शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार अशी गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू होती. मात्र साळवी यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात जोरदार खळबळ उडाली आहे. त्यामुळे राजन साळवी यांचा शिंदे यांच्या शिवसेनेतील पक्षप्रवेश निश्चित मानला जात आहे. ठाण्यात उदया गुरुवार १३ फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता साळवी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे.








