नवी दिल्ली
भारत बायेटेक समुहाची कंपनी बायोवेटच्या डेअरी पशूंना होणारा आजार लंपी स्कीन डिसिजसाठी तयार करण्यात आलेल्या लसीला सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायजेशनने (सीडीएससीओ) परवाना दिला आहे. वेगाने फैलावणाऱ्या वायरल इन्फेक्शनपासून गुरांना वाचविणारी ही जगातील पहिली लस असल्याचा दावा कंपनीने केला आहे. बायोवेटने ही लस भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या सहकार्याने विकसित केली आहे. या लसीला बायोलंपीवॅक्सिन नाव देण्यात आले असून लवकरच ती बाजारात उपलब्ध होणार आहे.









