सावंतवाडी । प्रतिनिधी
उपजिल्हा रुग्णालयातील सुरक्षारक्षक महेश बावकर यांच्यावर सावंतवाडीतील एकाने कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न केला. सामाजिक कार्यकर्ते राजु धारपवार यांनी वेळेत प्रसंगावधान दाखवल्यामुळे बावकर थोडक्यात बचावले. मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली. यासंदर्भात सुरक्षारक्षक बावकर यांनी पोलिसांना कळवले आहे . या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.









