कोल्हापूर :
जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून, फॉरेक्स ट्रेडिंग कंपनीच्या माध्यमातून चौघांच्या टोळीने एकाची 45 लाखांची फसवणूक केली. सोहेल अजीज बागवान (वय 30), अब्दुलअजीज महंमदहनीफ बागवान (55), सुमेर मोहम्मद कोटभागे (40, तिघे रा. लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर) आणि आरिफ सलीम जमादार (32, रा. गुरुवार पेठ, कोल्हापूर) अशी फसवणूक करणाऱ्याची नावे आहेत. त्याच्याविरोधी लक्ष्मीपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याची फिर्याद दिलावर गुलाब जमादार (वय 40, रा. दुसरी गल्ली, राजारामपुरी, कोल्हापूर) यांनी दिली आहे.
संशयित सोहेल बागवान आणि त्याच्या साथीदारांनी दिलावर जमादार याला फॉरेक्स ट्रेडिंग कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूकीवर जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी त्यांने वेळोवेळे बँक खात्यावरील आणि त्यांच्या घरातून सुमारे 45 लाख रुपये गुंतविले. मात्र, संशयितांनी त्याला परतावा आणि मुद्दलही परत केली नाही, असे जमादार फिर्यादी म्हटले आहे.








