बीजिंग :
चीनमध्ये विवाहांची संख्या सातत्याने कमी होत आहे. एकीकडे देशात वृद्धांच्या संख्येत वेगाने वाढ होत असताना दुसरीकडे युवा विवाह करणे टाळत आहेत. यामुळे भविष्यातील संकट आणखी गडद होण्याची भीती आहे. युवांनी योग्यवेळी विवाह करावेत आणि अपत्यांना जन्म द्यावा अशी सरकारची इच्छा आहे. परंतु सरकारच्या प्रयत्नांना यश मिळत नसल्याचे चित्र आहे. 2024 मध्ये चीनमध्ये 61 लाख विवाह झाले, तर 2023 मध्ये हा आकडा 77 लाख होता. 1986 मध्ये चीनमध्ये विवाहांची नोंदणी सुरू झाली होती. तेव्हापासून हा सर्वात कमी आकडा ठरला. 2013 मध्ये सर्वाधिक विवाहांची नोंदणी झाली होती. त्या वर्षाच्या तुलनेत 2024 मधील आकडा निम्माच आहे. चीनमध्ये विवाहांचे प्रमाण कमी होत असल्याने सरकारला पावले उचलावी लागली आहेत. अनेक राज्यांमध्ये विवाह नोंदणीचा नियम देखील संपुष्टात आणला गेला आहे. विवाह न करणाऱ्या युवांनी देखील मुलांना जन्म द्यावा असा यामागील विचार आहे.









