आयजोल :
ईशान्येतील राज्य मिझोरममध्ये विमानतळावरून राजकारण तापले आहे. राज्यातील मुख्य विरोधी पक्ष मिझो नॅशनल फ्रंटने (एमएनएफ) वायुदलाला लेंगपुई विमानतळ सोपविण्यास विरोध दर्शविला आहे. या विमानतळाला वायुदलाकडे सोपविण्याचा निर्णय जोरम पीपल्स मूव्हमेंट सरकारने घेतला आहे. तर एमएनएफ आमदारांनी या पार्श्वभूमीवर विमानतळाचा दौरा केला, या आमदारांचे नेतृत्व विरोधी पक्षनेते लालछंदामा राल्टे करत होते. मिझो नॅशनल फ्रंट आणि काँग्रेसच्या सरकारांनी राज्यातील पहिले विमानतळ उभारण्यास अत्यंत मेहनत केली आहे. डिसेंबर 2023 मध्ये झेडपीएम सत्तेवर आल्यावर मुख्यमंत्री लालदुहोमा यांनी सर्वप्रथम विमानतळाला वायुदलाकडे सोपविण्याचा प्रस्ताव मांडला. माजी मुख्यमंत्री लाल थनहवला (काँग्रेस) आणि जोरमथंगा (एमएनएफ) हे आर्थिक अडचणी असूनही विमानतळाची मालकी कायम राखण्यास सक्षम हेते. तर झेडपीएम सरकार आर्थिक आघाडीवर पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका राल्टे यांनी केली आहे. मिझोरमची रणनीतिक स्थिती पाहता लेंगपुईला एका लढाऊ विमानांच्या तळाच्या स्वरुपात विकसित केले जाऊ शकते. सातत्याने लढाऊ विमानांचे उ•ाण आणि हवाई क्षेत्र निर्बंध नागरी उ•ाण संचालनाला मर्यादित करू शकतात, असा दावा राल्टे यांनी केला आहे.









