वृत्तसंस्था/ मुंबई
हेक्सावेअर टेक्नॉलॉजी लिमीटेड यांचा आयपीओ 12 फेब्रुवारी रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. कंपनी या आयपीओच्या माध्यमातून 12.36 कोटी समभागांची विक्री करत 8750 कोटी रुपये उभारणार आहे. आयटी सेवा आणि एंटरप्राईज टेक विभागामध्ये भारतातील सदरच्या कंपनीचा हा सर्वात मोठा आयपीओ असणार आहे. 2002 मध्ये टाटा कन्सल्टंन्सी सर्व्हिसेस म्हणजे टीसीएस यांचा आयपीओ सादर करण्यात आला होता. ज्या अंतर्गत कंपनीने 4713 कोटी रुपये उभारले होते.
19 समभाग सुचीबद्ध
हेक्सावेअर कंपनीने आयपीओची किंमत 674-708 रुपये प्रति समभाग अशी निश्चित केली आहे. 12 फेब्रुवारी रोजी आयपीओ खुला होणार असून 14 फेब्रुवारीपर्यंत यामध्ये गुंतवणूक करता येणार आहे. कंपनीचे समभाग 19 फेब्रुवारी रोजी एनएसई व बीएसई यावर सूचीबद्ध होणार आहेत.
यांची 95 टक्के हिस्सेदारी
सीए मॅग्नम होल्डिंग्ज हे कंपनीचे प्रवर्तक असून त्यांची हिस्सेदारी कंपनीत 95.03 टक्के आहे. या आयपीओमध्ये एखाद्याला गुंतवणूक करायची झाल्यास एका लॉटसाठी 708 रुपये प्रति समभाग या प्रमाणे 14868 रुपये मोजावे लागणार आहेत. आयपीओचा 35 टक्के हिस्सा रिटेल गुंतवणूकदारांकरिता असणार असून पात्रताधारक संस्थात्मक गुंतवणुकदारांसाठी हिस्सा 50 टक्के राखीव असणार आहे. तर 15 टक्के बिगर संस्थात्मक गुंतवणुकदारांसाठी राखीव असणार आहे.









