क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
हंगरगा येथे एचपीएल गाव मर्यादीत क्रिकेट स्पर्धेत बुद्धिष्ट सोसायटी ऑफ इंडिया संघाने शिवसेना संघाचा पराभव करुन दुसऱ्यांदा एचपीएल चषक पटकाविले.
या संघात कर्णधार नामदेव लोहार, उपकर्णधार ऋत्विक पाटील, मिथुन चलवेटकर, स्वप्नील मुतगेकर, विनायक कांबळे, विष्णू पाटील, विवेक पिशानी, अमोल चलवेटकर, महादेव पाटील, सुधीर चलवेटकर, पुट्टाप्पा कांबळे, वैजु पिसानी, रोहीत पाटील, श्रवण पाटील, विजय कांबळे, विठ्ठल मेत्री, गंगाराम सोनवलकर आदी खेळाडूंचा समावेश आहे. या संघाचे पुरस्कर्ते संजय कांबळे व राजू कांबळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.









