प्रतिनिधी/ बेळगाव
बुलकच्या बैठकीत मीना कुलकर्णी यांनी ‘रेत समाधी’ या बुकर पुरस्कारप्राप्त पुस्तकाचा परिचय करून दिला. गीतांजली श्री यांनी प्रथम हिंदी भाषेत हे पुस्तक लिहिले. त्याचे इंग्रजी भाषांतर डेजी रॉकवेल यांनी केले. मराठीमध्येही याचा अनुवाद झाला आहे.
उत्तर भारतातील 80 वर्षीय ‘अम्मा’ मूळच्या पाकिस्तानच्या आहेत. पतीच्या मृत्यूनंतर ती खोल निराशेत अडकते. अंथरुणाला खिळलेली अम्मा ही रोझी या मुलीकडे राहायला येते. आपल्याला सरहद पार जायची आहे, अशी इच्छा व्यक्त करून ती पाकिस्तानला जाते. पूर्वीच्या सर्व स्थळांना, ओळखीच्या जागांना भेटी देते. फाळणीमुळे ताटातूट झालेल्या आपल्या नवऱ्याचा ती शोध घेते आणि पक्षाघाताने आजारी असलेल्या अन्वरची म्हणजे नवऱ्याची भेट होते. त्यानंतर अम्माचा मृत्यू होतो. पीठ, धूप, हदसरहद अशा तीन भागात ही कहानी येते. हा सर्व प्रवास मीना कुलकर्णी यांनी सविस्तरपणे मांडला.









