वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
येथील दिल्ली लॉन टेनिस संघटनेच्या टेनिसकोर्टवर 10 ते 16 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या एटीपी टूरवरील दिल्ली खुल्या चॅलेंजर्स टेनिस स्पर्धेसाठी भारताचे टेनिसपटू शशिकुमार मुकुंद, रामकुमार रामनाथन् आणि करणसिंग या तिघांना पुरुष एकेरीच्या प्रमुख ड्रॉकरिता वाईल्डकार्ड आयोजकांनी दिले आहे.
या स्पर्धेमध्ये लॉईड हॅरिस, 2019 च्या विम्बल्डन स्पर्धेतील कनिष्ठ गटातील विजेता मोचीझुकी यांच्यासह अन्य 8 सिडेड खेळाडूंचा समावेश राहिल. जपानच्या 21 वर्षीय मोचीझुकीला सिडींगमध्ये 6 वे स्थान मिळाले आहे. ब्रिटनचा बिली हॅरीस आणि ऑस्ट्रेलियाचा स्कूलकेटी यांना अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान मानांकनात देण्यात आले आहे.









