वृत्तसंस्था/ दुबई
पाकमध्ये चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धा सुरू होण्यासाठी आता केवळ 11 दिवसांचा कालावधी बाकी असताना न्यूझीलंड संघातील वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनच्या सहभागाबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
संयुक्त अरब अमिरातमध्ये झालेल्या सामन्यात फर्ग्युसनला स्नायु दुखापत झाली होती. या दुखापतीतून तो अद्याप पूर्णपणे बरा झाला नसल्याचे क्रिकेट न्यूझीलंडतर्फे सांगण्यात आले आहे. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील न्यूझीलंडचा अ गटातील सलामीचा सामना कराचीच्या नॅशनल स्टेडियवर 19 फेब्रुवारी रोजी होणार आहे. फर्ग्युसनच्या या दुखापतीची वैद्यकीय चाचणी केली असून त्याच्या या दुखापतीचे स्कॅनिंग करण्यात आले आहे. फर्ग्युसनने आतापर्यंत 65 वनडेमध्ये न्यूझीलंड प्रतिनिधीत्व केले आहे. फर्ग्युसन पाकमधील या स्पर्धेसाठी उपलब्ध होऊ शकला नाही तर न्यूझीलंड संघात शेवटच्या क्षणी बदली खेळाडूची निवड केली जाईल









