दिल्लीच्या निकालावर काय म्हणाले उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील
कोल्हापूर
विरोधकांना वाटलं मोदीजींचा करिष्मा संपला, मात्र मोदींचा करिष्मा संपला नाही संपणार ही नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सर्वसामान्यांचा विश्वास इतका वाढला आहे. त्याच्या नेतृत्वात सरकार स्थापन होऊ दे म्हणजे त्या लोकांचा आणि राज्याचा विकास होणार आहे. याला अपवाद २०२४ लोकसभा होती खोटं नरेटीव्ह सेट करण्यात आला मात्र नंतर लोकांना कळालं गडबड झाली आणि विधानसभेला त्यांनी करेक्ट केलं. लोकसभेला मिळालेल्या यशानंतर विरोधकांना वाटलं मोदीजींच्या करिष्मा संपला मात्र मोदीजींचा करिष्मा संपला नाही संपणार नाही. यामुळे महाराष्ट्र आणि हरियाणा मध्ये वनवे यश मिळालेलं आहे दिल्लीमध्ये देखील हीच परिस्थिती आहे. सरकार येत आहे आणि चांगल्या मर्जिन ने येत आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्राकांत पाटील यांनी दिली.
यावेळी त्यांनी केजरीवाल यांच्या बद्दल विचारणा केली असताना ते म्हणाले, केजरीवाल यांनी केलेला दावा फोल ठरला. आता सुरू होईल राहुल गांधी यांनी ड्रेस घेऊन आकडे मांडण्याचा प्रयत्न केला. निवडणूक आयोगाने म्हटलेला आहे यावर उत्तर देणार आहे. लोकांनाही कळालेला आहे तीच तीच कॅसेट का चालवता. कर्नाटकात यश मिळालं की ईव्हीएम चांगला आणि महाराष्ट्रात निकाल लागला की घोटाळा झाला म्हणता.
कॉंग्रेस पक्षाविषयी विचारले असता ते म्हणाले, कोणी अडवल होत का एकत्र यायला. संजय राऊत महान नेते आहेत. ते दोघांमध्ये समझोता करू शकले असते. काँग्रेसला सपोर्ट न करता शिवसेना उबाठा आपला सपोर्ट केला आहे येथेच मोठी ठिणगी पडली आहे. आता त्या आघाडीतून इतर जण बाहेर पडण्यापेक्षा काँग्रेसच बाहेर पडेल.
पुढे खासदार संजय राऊत यांच्याबद्दल बोलताना म्हणाले, संजय राऊत यांना जादूच्या कांडीने रिझल्ट चांगले मिळतात असं वाटत असेल तर त्यांनी पत्रकार परिषद न घेता साधना करावी आणि जादूची कांडी शोधावी.
ऑपरेशन टायगर म्हणाले, नाचता येईना अंगण वाकडे झाले आहे.
समरजीत घाटगे बद्दल बोलताना म्हणाले, भाजपची दोघा तिघांची समिती झालेली आहे. प्रत्येकाची नावे तेथे जातील प्रत्येकाचं प्लस मायनस पाहिला जाईल आणि निर्णय घेण्यात येईल.
राज्यातल्या सगळ्या महिलांचे लक्ष असलेल्या लाडकी बहीण योजनेबद्दल बोलताना म्हणाले, दोन कोटी 42 लाख महिलांना लाभ मिळालेला आहे. मग ग्लास अर्धा रिकामा आहे म्हणायचं की अर्धा भरलेला आहे असं म्हणायचं.ज्यांच्याकडे कार आहे इन्कम टॅक्स भरलेला आहे किंवा एका घरात अनेक महिलांनी लाभ घेतलेला आहे अशा ५ लाख महिलाना वगळण्यात आलेल्या आहेत. इतकं आरडाओरडा करण्याची गरज नाही. गेलेले पैसे पुन्हा घेणार नाही असं कॅबिनेट मध्ये चर्चा झालेली आहे.









