वृत्तसंस्था / न्यूयॉर्क
24 वर्षीय महिला टेनिसपटू बियान्का अँडेस्क्यू शस्त्रक्रिया झाल्यानंतर अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त झाली नसल्याने तिला आणखी काही दिवस टेनिसपासून अलिप्त रहावे लागेल. 2025 च्या टेनिस हंगामाला ती आणखी काही दिवसांनी प्रारंभ करणार असल्याचे सांगण्यात आले.
चालु महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या मेरीडा खुल्या टेनिस स्पर्धेत सहभागी होण्याचा तिचा विचार असल्याचे सांगण्यात आले. काही दिवसांपूर्वी अपेंडिक्सची तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. 2019 साली तिने अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा जिंकली होती. मात्र गेल्या दोन वर्षांमध्ये तिला वारंवार दुखापतीमुळे अनेक स्पर्धांना मुकावे लागले आहे. गेल्या ऑक्टोबरमध्ये तिने आपली शेवटची स्पर्धा पॅन पॅसिफीकमध्ये खेळली होती.









