आरोपींनी महिलेला बाहेर फेकले
वृत्तसंस्था/ चेन्नई
तामिळनाडूत दोन जणांनी गरोदर महिलेचे रेल्वेत शोषण केले आहे. संबंधित महिला आंध्रप्रदेशच्या चित्तूर येथे जात होती. शुक्रवारी पहाटे रेल्वे तिरुपत्तूर जिल्ह्याच्या जोलारपेट्टई येथे पोहोचली असताना आरोपींनी महिलेसोबत गैरवर्तन केले. महिला वॉशरुमच्या दिशेने जात असताना दोघांनी तिचा पाठलाग केला, महिलेने मदतीसाठी आवाज दिल्यावर आरोपींनी तिला रेल्वेतून बाहेर ढकलले आहे.
रेल्वेतून खाली कोसळल्याने महिला जखमी झाली आहे. उपचारासाठी तिला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी गुन्हा नेंदविण्यात आला असून हेमराज नावाच्या इसमाला अटक करण्यात आली आहे. गुन्हेगारांची ओळख पटविण्यासाठी पोलीस सीसीटीव्ही फुटेज पडताळून पाहत आहेत.
या घटनेवरून आता राजकारण देखील होऊ लागले आहे. एका गरोदर महिलेचे लैंगिक शोषण करण्यात आले आणि यानंतर तिला रेल्वेतून खाली ढकलून देण्यात आले आहे. तामिळनाडूत महिला आता सुरक्षित नाहीत. द्र्रमुकच्या शासनकाळात शाळा, महाविद्यालये, ऑफिसमध्ये महिला सुरक्षित नाहीत. तसेच आता त्या रेल्वेतूनही प्रवास करू शकत नसल्याची टीका अण्णाद्रमुकचे महासचिव के. पलानिस्वामी यांनी केली आहे.









