मुंबई :
इलेक्ट्रिक दुचाकी विक्रीतील आघाडीची कंपनी ओला इलेक्ट्रीकने भारतामध्ये दुचाकी विक्रीत हिस्सेदारी वाढविण्यामध्ये यश मिळविले आहे. जानेवारी महिन्यात कंपनीने एकंदर दुचाकी विक्रीमध्ये 25 टक्के हिस्सेदारी प्राप्त केली आहे. 24335 वाहनांची विक्री केली असल्याची माहिती वाहन या पोर्टलमधून समोर आली आहे.
मागच्या वर्षी एप्रिलमध्ये कंपनीची हिस्सेदारी 53 टक्के इतकी राहिली होती. त्या तुलनेमध्ये जानेवारीतील हिस्सेदारी निम्मीच दिसून आली आहे. इलेक्ट्रिक दुचाकी क्षेत्रामध्ये वाढलेली स्पर्धा, नियामकसंदर्भातील कडक अंमलबजावणी त्याचप्रमाणे ग्राहकांच्या वाढत्या तक्रारी या पार्श्वभूमीवर ओला इलेक्ट्रिकला अपेक्षेएवढी हिस्सेदारी प्राप्त करण्यामध्ये तसे पहायला गेल्यास अपयशच आले आहे. टीव्हीएस मोटार्स, बजाज ऑटो आणि अॅथर एनर्जी यासारख्या कंपन्यांशी ओलाला टक्कर द्यावी लागते. या तिनही कंपन्यांची बाजारातील एकत्रित हिस्सेदारी 90 टक्के इतकी आहे.









