रत्नागिरी :
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आता रत्नागिरी जिल्ह्यातील लाभार्थ्यांची पडताळणी सुरू झाली आहे. प्राप्त अर्जासोबतच प्रत्यक्ष भेट घेवून लाभार्थी महिलांची पडताळणी करण्याचे महिला आणि बालविकास विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. सोबतच रेशनकार्डनुसार कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे चारचाकी वाहन असल्यास अथवा कुटुंबातील व्यक्ती शासकीय कर्मचारी असल्यास लाभार्थी महिलेला या योजनेतून वगळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.








