सिद्धार्थ चोप्राचे व्यक्तीगत आयुष्य हे नेहमीच चर्चेत राहीले आहे. २०१४ मध्ये कनिका माथूर सोबत सिद्धार्थच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली होती. पण त्या चर्चेवर पडदा पडत सिद्धार्थने आपल्या पुण्यातील व्यवसायाकडे लक्ष केंद्रीत केले. २०१९ मध्ये सिद्धार्थने पुन्हा इशिता कुमार सोबत नवी दिल्ली मध्ये साखपुडा रचला होता. या वेळी प्रियांका चोप्रा आणि निक जोनासही उपस्थित होते. याच वर्षी ३० एप्रिलला होणारं लग्ना रद्द झालं. यावर प्रियांकाच्या आई मधु चोप्रा यांनी सिद्धार्थ अजून लग्नासाठी तयार नसल्याची प्रतिक्रीया दिली.
२०१९ मध्ये पुन्हा सिद्धार्थच्या आयुष्यात प्रेमाचा किरण उगवला. सिद्धार्थ अभिनेत्री निलम उपाध्यायच्या प्रेमात पडला. एप्रिल २०२४ मध्ये सिद्धार्थ आणि निलमच्या रोका समारंभ झाला. पुढे ऑगस्ट महिन्यात साखरपुडा आणि हस्ताक्षर समारंभ संपन्ना झाला, तर आता फेब्रुवारीमध्ये लग्न सोहळा पार पडत आहे.