विटामिन D म्हणजे काय? विटामिन D हे एक महत्त्वाचे स्निग्ध-विरघळणारे (Fat-soluble) जीवनसत्त्व आहे, जे शरीरात हाडे मजबूत करण्यासाठी, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि कॅल्शियम तसेच फॉस्फरस यांचे संतुलन राखण्यासाठी आवश्यक असते.

विटामिन D3 म्हणजे काय? विटामिन D च्या दोन प्रकारांपैकी (D2 आणि D3), विटामिन D3 (Cholecalciferol) हा नैसर्गिकरित्या मिळणारा प्रकार आहे.तो प्रामुख्याने सूर्यप्रकाशातून मिळतो आणि शरीरात त्वचेच्या माध्यमातून तयार होतो.

हा प्रकार शरीरात अधिक प्रभावीरीत्या कार्य करतो आणि हाडांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. शरीरात विटामिन D आणि D3 ची मात्रा योग्य असेल तर हाडे व दात मजबूत करणे, सांधेदुखी, संधिवात टाळणे, रोगप्रतिकारशक्ती वाढवणे, संसर्ग आणि आजार टाळण्यास मदत करणे, हृदय व मेंदूचे आरोग्य सुधारणे, रक्तदाब नियंत्रित ठेवणे, नैराश्य कमी तसेच मानसिक आरोग्यास मदत करणे, हे प्रामुख्याने होते. मधुमेह व हृदयविकाराचा धोका कमी करत, शरीरातील इन्सुलिन नियंत्रित ठेवण्यास मदत होते. 

विटामिन D आणि D3 मिळवण्यासाठी उपयुक्त पदार्थ सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत 15-20 मिनिटे सुर्यप्रकाशात बसणे, मासे (सॅल्मन, ट्यूना, सार्डिन), अंडी, कोड लिव्हर ऑइल,दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, मशरूम, सोया मिल्क, बदाम दूध, संत्री रस (Fortified Orange Juice) यामधून विटॅमिन D आणि D3 मिळते.

शरीरात विटामिन D ची कमतरता असेल तर हाडे ठिसूळ होणे(Osteoporosis), थकवा आणि अशक्तपणा, वारंवार सर्दी-खोकला होणे, सांधेदुखी आणि स्नायू कमजोर होणे, नैराश्य आणि मानसिक थकवा असे दुष्परिणाम दिसून येतात. 

Fविटामिन D  या जीवनसत्त्वाची लहान मुलांमध्ये 400-600 IU, प्रौढांमध्ये 600-800 IU आणि ज्येष्ठ नागरिकामध्ये  800-1000 IU इतकी  दैनंदिन गरज असते. 

विटामिन D आणि D3 हे शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे असून, ते हाडांसाठी तसेच एकूण आरोग्यासाठी उपयुक्त आहे. योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश, संतुलित आहार आणि गरज असल्यास सप्लिमेंट्सच्या मदतीने हे जीवनसत्त्व शरीराला पुरवावे.