प्रतिनिधी
बांदा
गाळेल येथील 20 वर्षीय भिकाजी संदीप सावंत या युवकाने विष प्राशन केल्याने तो गंभीर असून अधिक उपचारासाठी त्याला गोवा बांबोळी येथे पाठवण्यात आले आहे.बांदा कट्टा कॉर्नर येथे विष प्राशन केल्याने तो रस्त्यावर लोळत होता. स्थानिक ग्रामस्थांनी त्याला बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले. मात्र जास्त प्रमाणात विष घेतल्याने त्या गंभीर युवकास सावंतवाडी येथे अधिक उपचारासाठी पाठविले. तेथून त्याला गोवा बांबोळी येथे पाठविले. भिकाजी संदीप सावंत वय 20 असे त्याचे नाव आहे. बांदा पोलिसात याबाबतची कोणतीच नोंद नव्हती. अलीकडेच सलग दोन दिवस गाळेल येथील दोन युवकांनी लागोपाठ आत्महत्या केली. त्यातच आज अजुन एका युवकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात उलट सुलट चर्चा सुरु आहे. पोलीस प्रशासनाने याबाबत लक्ष घालावे अशीच मागणी होत आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की, बांदा कट्टा कॉर्नर येथे दोडामार्ग मार्गावर सदर युवक विष प्राशन करून रस्त्यावर लोळत होता. दरम्यान ही बाब मार्गावरून जाणाऱ्या स्थानिकाच्या लक्षात आली असता त्याला काय झाले असे विचारले असता आपण विष घेतल्याचे सांगितले. यावेळी त्याला बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. येथील वैद्यकीय अधिकारी गजानन सारंग यांनी उपचार करून त्याला अधिक उपचारासाठी सावंतवाडी येथे पाठविले. सावंतवाडी येथे उपचार करून त्याला गोवा बांबोळी येथे पाठविले. याबाबत सायंकाळी उशिरा पर्यंत बांदा पोलिसात कोणतीच नोंद नव्हती.सलग दोन दिवस गाळेल येथे दोन युवकांनी लागोपाठ आत्महत्या करून आपले जीवन संपविले. त्यातच आज गाळेल येथील युवकाने विष पिऊन जीवन संपविण्याचा प्रयत्न केला त्यामुळे परिसरात उलटसुलट चर्चा सुरु आहे. नेमके कोणत्या कारणाने येथील युवक आपले जीवन संपवित आहेत असा प्रश्न निर्माण होत आहे. याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष घालून शोध घेणे गरजेचे असल्याचे उघडपणे बोलले जात आहे.
Previous Articleकोल्हापुरात बर्निंग कारचा थरार
Next Article आजचे भविष्य गुरूवार दि. 6 फेब्रुवारी 2025









