कंपनीत डेटिंग ऑफिसरचे पद
जर एखादा व्यक्ती स्वत:चा प्रियकर किंवा प्रेयसीपासून वेगळा होत असेल तर तो मनाने कोलमडून गेलेला असतो. ब्रेकअपचे दु:ख माणसाच्या जीवनात अत्यंत मोठे असते. यातून बाहेर पडणे लोकांसाठी सोपे नसते. परंतु ब्रेकअपचे दु:ख झेलणाऱ्या लोकांना नोकरीची ऑफर मिळत असेल तर प्रत्येकाचा ब्रेकअप व्हावा असे वाटू लागेल. एका कंपनीने चीफ डेटिंग ऑफिसरची पोस्ट काढली असून याकरता 1 किंवा त्याहून अधिक ब्रेकअप झालेले लोक अर्ज करू शकतात.
टॉपमेंट कंपनीत ट्विटर युजर निमिशा चंदा मार्केटिंग लीड आहे. अलिकडेच तिने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली जी तिच्या कंपनीतील एका व्हॅकन्सीशी संबंधित आहे. ही पोस्ट चीफ डेटिंग ऑफिसरशी संबंधित आहे. या नोकरीसाठी डेटिंग कल्चरची जाणीव असणारा आणि डेटिंगविषयी चांगला सल्ला देणारा व्यक्ती हवा आहे.
डेटिंगशी निगडित बजवर्ड्स समजू शकेल आणि त्यांना सोप्या शब्दांमध्ये सोडवू शकेल अशा व्यक्तीची कंपनीला गरज आहे. उमेदवाराचा कमीतकमी एकदा तरी ब्रेकअप झालेला असावा. सिच्युएशनशिपमध्ये तो राहिलेला असावा आणि 3 वेळा त्याच्या डेट्स झालेल्या असाव्यात. 2-3 डेटिंग अॅप्सवर काम केलेल्या व्यक्तीला या नोकरीकरता प्राधान्य दिले जाणार आहे. कंपनीने पोस्टसोबत एक लिंकही दिली असून ज्यात फॉर्म आहे, याचबरोबर पूर्ण टीमचे छायाचित्र शेअर करण्यात आले आहे. या पोस्टला 23 हजारांहून अधिक ह्यूज मिळाल्या असून लोकांनी यावर कॉमेंट केली आहे.









