रत्नागिरी :
रत्नागिरीत अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेला व सध्या नाशिक कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या साहिल काळसेकर याने जेल अधिकाऱ्यावर हल्ला केल्याचे समोर आले आहे. जगदीश ढुमणे असे या जेले अधिकाऱ्याचे नाव आहे. काळसेकर याच्या हल्ल्यात दुमणे हे जखमी झाले असून या प्रकरणी त्यांनी नाशिक येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
साहिल काळसेकर हा नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. या जेलमध्ये काळसेकर याच्याकडून गैरवर्तन होत असल्याने दुमणे हे त्याची समजूत काढत होते. यावेळी काळसेकर हा मी तुमच्या नावाची चिठ्ठी लिहून आत्महत्या करीन तसेच माझे डोके आपटून घेईन, अशा धमक्या देत होता. ३१ जानेवारी रोजी ढुमणे हे काळसेकर याला चांगली वागणूक देण्यासंबंधी सांगत होते. यावेळी काळसेकर याने टेबलावरील काठी उचलून दुमणे यांना मारली.








