मुंबई
बॉलीवूडमध्ये एकेकाळी आपल्या अभिनयाने भूरळ पाडणारा अभिनेता म्हणून अक्षय खन्ना ची ओळख होते. ताल, रेस, हलचल, हमराज असे अनेक एकसेएक हीट सिनेमे अक्षय खन्ना ने दिले आहेत. अक्षय खन्ना ने अभिनेता विनोद खन्ना यांचा मुलगा म्हणून इंडस्ट्रमध्ये सुरुवात केली. त्यानंतर उत्कृष्ट अभिनेता अशी त्याची स्वतंत्र ओळख झाली. कालांतराने तो सिनेमांमध्ये दिसायचा कमी झाला. त्याच्या आगामी छावा हा चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. या सिनेमामध्ये त्याने औरंगजेबाची भूमिका करत आहे.
त्याने एका मुलाखतीत सांगितले होते की, मी स्वतःला विवाहित असलेलं बघू शकत नाही. मी मॅरेज मटोरियल नाही आहे. मी त्यासाठी बनलेलोच नाही आहे. लग्न ही एक कमिटमेंट आहे, पण यामुळे आपल्या जीवनशैलीमध्ये मोठा बदलही होतो. लग्नानंतर आपल्या आयुष्यात अनेक बदल होतात. पण मला माझ्या आयुष्यावर पूर्ण नियंत्रण हवे आहे. जेव्हा आपण आपले आयुष्य एका पार्टनरसोबत शेअर करतो. तेव्हा आपल्या आयुष्यावर पूर्णपणे ताबा राहत नाही. अनेकदा आयुष्यावरील नियंत्रण सोडावे लागते. म्हणून मी अजून तरी लग्नाचा विचार केलेला नाही.
याचवेळी त्याला मूल दत्तक घेण्याविषयी विचारले असता, तो म्हणाला, मी अजूनही या निर्णयासाठी तयारी नाही. मला माझ आयुष्य कोणासोबतच शेअर करायचं नाही आहे. लग्न करू असो व मुल जन्माला घालून असो, मला तसं करायचं नाही आहे. मुलाच्या निर्णयानंतर तुमच्या आयुष्यात खूप बदल होतात. मुलांमुळेही तुमचं महत्त्व कमी होऊन शकतो. मुलांना जास्त महत्त्वा द्यावे लागते. असे बदल मला करायचे नाही आहेत. आणि मी भविष्यातही यासाठी कधी तयार होईन असे वाटत नाही. अशी प्रतिक्रिया अक्षय खन्ना याने या मुलाखती दरम्यान दिली.
Previous Articleहेम्माडगा रस्ता वाहतुकीसाठी बंद
Next Article फेब्रुवारीच्या प्रारंभीच उन्हाचे चटके









