कोक्राझार
आसाम पोलिसांच्या एसटीएफला मोठे यश मिळाले आहे. एसटीएफने ऑपरेशन प्रघातच्या अंतर्गत एका दहशतवाद्याला अटक केली आहे. हा दहशतवादी कट्टरवादी नेटवर्क आणि जागतिक दहशतवादी संघटनांशी संबंधित होता. एसटीएफने कोक्राझार पोलिसांच्या मदतीने नसिम उदीन एसकेला अटक केली आहे. अंसारुल्लाह बांगला टीम आणि जमात-उल-मुजाहिदीनचा तो सक्रिय सदस्य होता. नसिम हा अनेक कटांमध्ये सामील होता. नसिमला न्यायालयात हजर करण्यात आले असता 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.









