पिवळे बेदाणे हे द्राक्षांपासून तयार केलेला एका सुकामेव्याचा प्रकार आहे. हे सोनेरी, पिवळसर किंवा फिकट तपकिरी रंगाचे असतात आणि गोडसर चव असते.

उत्तम प्रतीच्या द्राक्षांपासून तयार होतात. गंधक वाफेच्या प्रक्रियेद्वारे वाळवले जातात, त्यामुळे त्यांचा सोनेरी-पिवळा रंग टिकतो.

काही वेळा त्यावर तेलाचा थर दिला जातो जेणेकरून ते मऊ आणि चविष्ट राहतील.

पिवेळ्या बेदाण्यांमध्ये फायबर, लोह, अॅंटीऑक्सिडंट्स, नैसर्गिक साखर मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे ते पचनक्रिया, हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी, शरीरातील हानिकारक घटक काढण्यास, त्वरीत उर्जा देण्यास पूरक ठरतात.

पिवळ्या बेदाण्यांचा उपयोग मिठाई, केक, कुकीज, हलवा, बासुंदी. भात, पुलाव आणि पराठे यामध्ये स्वाद वाढवण्यासाठी केला जातो. 

पिवळे बेदाणे  हाडे मजबूत करतात,  रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात, त्वचा चमकदार आणि निरोगी ठेवते. दुधासोबत सेवन केल्यास ताकद वाढते.

पिवळे बेदाणे हे चवदार व पौष्टिक असून ते नियमित आहारात घेतल्यास अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात.