रत्नागिरी :
शिवसेना ठाकरे पक्षातील उदय बने व जयसिंग घोसाळे यांनी रविवारी खासदार नारायण राणे यांची भेट घेतली. खासदार नारायण राणे हे जिल्हा नियोजनच्या बैठकीसाठी रत्नागिरीत आले होते. यावेळी उदय बने व जयसिंग घोसाळे यांनी राणे यांची भेट घेण्यासाठी उपस्थित होते. दोघांशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता सहज भेटण्यासाठी आलो, असे उत्तर दोघांनीही दिले. दरम्यान दोघांनीही घेतलेल्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. उदय बने हे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्नशील होते. मात्र आयत्यावेळी बाळ माने यांना पक्षाकडून तिकीट देण्यात आल्याने बने हे नाराज झाल्याचे बोलले जात आहे. सध्या पक्षामध्ये ते सक्रिय असल्याचे दिसत नाहीत. या पार्श्वभूमीवर त्यांनी खासदार नारायण राणे यांची भेट घेतल्याने वेगळीच खिचडी शिजत असल्याचे बोलले जात आहे.
Previous Articleप्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेत सहभाग नोंदवा
Next Article हरित उर्जा निर्मित्तीचे अधिकाधिक प्रयत्न हवे








