६ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत, चौघांना अटक
स्थानिक गुन्हे अन्वेषणची कामगिरी
रत्नागिरी
रत्नागिरी शहर व लगतच्या परिसरातून मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या टोळीला गजाआड करण्यात पोलिसांना यश आले. मागील काही दिवसांपासून सातत्याने बॅटऱ्या चोरीच्या घटना समोर येत होत्या. पोलिसांकडून या चोरट्यांचा शोध घेण्यात येत होता. शनिवारी रात्री स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून चोरट्यांना जेरबंद करण्यात आले. त्यांच्या ताब्यातून दोन कारसह ६ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
Previous Articleपाईपलाईनच्या गॅस जोडणीला गती,मात्र अजूनही सिलिंडर संख्या लाखात
Next Article केजी टू पीजीचे शिक्षण मोफत मिळावे








