5 मार्च रोजी पदभार स्वीकारणार : नेतान्याहू यांची घोषणा
वृत्तसंस्था/ तेल अवीव
इस्रायलच्या सैन्यातूत मेजर जनरल म्हणून सेवानिवृत्त झालेल्या ऐयाल जामिर यांची सैन्यप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ऐयाल जामिर हे लेफ्टनंट जनरल हरजी हलेवी यांची जागा घेणार आहेत. जामिर हे आयडीएफचे 24 वे अध्यक्ष ठरतील, ते 6 मार्च रोजी याचा पदभार स्वीकारणार आहेत. हलेवी यांनी हमासचा हल्ला रोखण्यास अपयश आल्याने मागील महिन्यात सैन्यप्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. हमाससोबत झालेल्या शस्त्रसंधीनंतर हलेवी यांनी स्वत:च्या पदाचा राजीनामा दिला होता.
ऐयाल यांना मी अनेक वर्षांपासून ओळखतो. आयडीएफला आगामी आव्हानांना सामोरे जाण्यासाठी ते मजबुतीने नेतृत्व करतील असा मला पूर्ण विश्वास आहे. या जबाबदारीसाठी मी त्यांना शुभेच्छा देतो असे उद्गार हलेवी यांनी काढले आहेत.
पॅलेस्टिनी दहशतवाद्याला इशारा
इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्ज यांनी दहशतवादी जकारिया जुबैदीला जाहीरपणे इशारा दिला आहे. जकारिया जुबैदीला अलिकडेच गुरुवारी ओलिसांच्या मुक्ततेदरम्यान तुरुंगातून सोडण्यात आले होते. जकारियाला इस्रायली ओलिसांच्या मुक्ततेच्या कराराच्या अंतर्गत सोडण्यातआले आहे. जकारियाने यापुढे एक जरी चूक केलीतर तो स्वत:च्या जुन्या मित्रांना भेटणार आहे. आम्ही दहशतवादाचे समर्थन कदापिही सहन करणार नसल्याचे काट्ज यांनी म्हटले आहे.
कोण आहे जकारिया जुबैदी?
49 वर्षीय जकारिया हा अल-अक्सा शहीद ब्रिगेडचा प्रमुख राहिला आहे. त्याने 2002 मध्ये बेइन शियानमध्ये लिकुड पोलिंग सेंटरवर हल्ला करविला होता, यात 6 जण मारले गेले होते. 2004 मध्ये त्याने तेल अवीवमधील बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारली होती. याचबरोबर अनेक बसेसवर गोळीबार आणि हल्ल्यांमध्ये तो सामील राहिला आहे. 2021 मध्ये जुबैदी हा इस्रायलच्या गिलबोआ तुरुंगातून पळून जाणाऱ्या कैद्यांपैकी एक होता, परंतु त्याला पुन्हा पकडण्यात आले होते. दुसऱ्या इंतिफादा (2000-2005) दरम्यान इस्रायलकडून करण्यात आलेल्या हत्येच्या अनेक प्रयत्नांनंतरही तो बचावल्याने गाझामध्ये त्याला मोठी लोकप्रियता प्राप्त आहे.









