वृत्तसंस्था/ बँकॉक
येथे सुरू असलेल्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या थायलंड मास्टर्स सुपर 300 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा माजी टॉपसिडेड किदांबी श्रीकांत आणि शंकर सुब्रमाणियन यांचे पुरुष एकेरीतील आव्हान उपांत्यपूर्व फेरीत समाप्त झाले.
शुक्रवारी पुरुष एकेरीच्या सामन्यात चीनच्या सहाव्या मानांकित वेंगने के. श्रीकांतचा 21-17, 21-16 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. तर दुसऱ्या एका सामन्यात चीनच्या झुने सुब्रमणियनचा 19-21, 21-18, 21-13 अशा गेम्समध्ये पराभव केला.









