कोल्हापूरः
कोल्हापूरच्या हद्दवाढीवर सरकार निर्णय घेईल. कोल्हापुरात सर्व त्यांचे आमदार निवडून आलेत, ते निर्णय घेतील. जे यावर सह्या करतील. त्यांनी निर्णय घ्यावा, अशी प्रतिक्रीया आमदार सतेज पाटील यांनी दिली.
कुंभमेळा संदर्भातल बोलताना आमदार पाटील म्हणाले, उत्तरप्रदेश मध्ये होणारा कुंभमेळा हे आमचं धार्मिक स्थान. कुंभमेळा हा सर्वसामान्य लोकांचा आहे. तिथं व्हीआयपींसाठी चांगली सेवा सुविधा मिळते. अशी सुविधा सर्वसामान्य भाविकांना मिळाली असती तर अस घडलं नसतं.
ते पुढे थेट पाईप लाईन संदर्भात बोलताना म्हणाले, थेट पाईप लाईन कोल्हापुरात आणली आहे. मात्र तिथून पुढं वितरण व्यवस्था ही कोल्हापूर महानगरपालिकेची जबाबदारी आहे. त्याबाबत प्रशासक यांच्याशी चर्चा झाली आहे. ते यासंदर्भतील व्यवस्था करतील.









