इब्राहिम अली खान करतोय धर्मा सोबत पदार्पण

करण जोहरने नुकताच इब्राहीम अली खानचे धर्मा प्रोडक्शन मधून पदार्पण होत असल्याचे सोशल मिडीयावर जाहीर केले.

इब्राहिम अली खान हा सैफ अली खान आणि अम्रिता सिंग चा मुलगा आहे. तर अभिनेत्री  सारा अली खानचा भाऊ आहे. 

करण जोहरने इब्राहिम अली खानचे काही फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आणि धर्मा सोबत पदार्पण होत असल्याचे जाहीर केले. 

या पोस्टवर करण जोहर ने अम्रिता सिंगसोबतच्या पहिल्या भेटीची आठवण कॅप्शनमध्ये लिहीली आहे. 

रॉकी और राणी की प्रेम कहाणी या सिनेमासाठी इब्राहीमने करण जोहरला असिस्ट केले होते. 

करण जोहर ने यापूर्वी इब्राहिमच्या वडिलांसोबत म्हणजेच सैफ अली खान सोबत कल हो ना हो, कुरबान अशा अनेक सिनेमांमधून काम केले आहे. करण जोहर चे इब्राहिम च्या कुटुंबियांशी ४० वर्षाहुन अधिक काळाचे ऋणानुबंध आहेत.