वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताचा माजी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता मुष्टीयोद्धा मनोजकुमारने मुष्टीयुद्ध क्षेत्रातून आपली निवृत्तीची घोषणा येथे गुरुवारी केली. या क्षेत्रातून निवृत्त झाल्यानंतर आता तो आपल्या मुष्टीयुद्ध प्रशिक्षण क्षेत्रात प्रवेश करणार आहे. 39 वर्षीय मनोजकुमारने 2010 साली दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते. या स्पर्धेत एकमेव सुवर्णपदक मिळविणाऱ्या मनोजकुमारने त्यानंतर दोनवेळा आशियाई चॅम्पियनशीप स्पर्धेत कास्यपदक पटकाविले होते. 2018 साली गोल्डकोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्याने कास्यपदक मिळविले होते. 2012 ची लंडन आणि 2016 च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने भारताचे प्रतिनिधीत्व केले होते.









